कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यातील रुग्ण संख्या ‘चारशे’जवळ…

0
172

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मागील आठवड्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चोवीस तासांत जिल्ह्यात आणखी २८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (गुरुवार) दिवसभरात १४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर तब्बल ५०९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरातील १३, आजरा, भुदरगड, गडहिंग्लज, हातकणंगले, करवीर तालुक्यातील प्रत्येकी २, पन्हाळा तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण २८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची कोरोना रुग्णस्थिती –

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५०,५८१, डिस्चार्ज – ४८, ४५५, उपचारासाठी दाखल रुग्ण – ३८१, मृत्यू – १७४५.