कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येने केला ५० हजारांचा टप्पा पार

0
93

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्येने आज (रविवार) ५० हजारांचा टप्पा पार केला आहे.  गेल्या २४ तासात १३ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ८२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील १० आणि करवीर तालुक्यातील ३ अशा तेरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोल्हापुरातील रामानंद नगर येथील १ आणि लक्षतीर्थ वसाहत येथील १ अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५०,००८.

डिस्चार्ज – ४८,१६४.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ११५ .

मृत्यू – १७२९.