कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णसंख्येत लक्षणीय घट

0
72

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ९४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ५७४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १३, चंदगड तालुक्यातील २,  गडहिंग्लज तालुक्यातील २, गगनबावडा तालुक्यातील १,  हातकणंगले तालुक्यातील २, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील ६ अशा एकूण ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,२२३

एकूण डिस्चार्ज : ४५,६५८

उपचारासाठी दाखल रुग्ण : ९२२

एकूण मृत्यू : १६४३