कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

0
292

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक रुग्णांचा समावेश आहे. गेल्या चोवीस तासात ९३ जणांना कोरोनाची लागण झाली असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) दिवसभरात ६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १,४६७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ५२, भूदरगड तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील ६, करवीर तालुक्यातील ८, पन्हाळा तालुक्यातील ३, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १० आणि इतर जिल्ह्यातील १० अशा ९३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर वाळवा तालुक्यातील येल्लूर येथील ४९ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५१,८०६.

डिस्चार्ज – ४९,२९७.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ७४३.

मृत्यू – १७६६.