कोल्हापूर कोरोना अपडेट : कोरोना रुग्णांची संख्या ‘६००’ च्या वर

0
88

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ७३ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात १४ जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. तसेच १,६६३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३०, आजरा तालुक्यातील २, भूदरगड तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील १०, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १५ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशी आहे. तर मिरज येथील सोमवारपेठ इथे राहणाऱ्या एका वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,४७६.

डिस्चार्ज – ४९,११५.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ६०२.

मृत्यू – १७५९.