कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णांची संख्या पुन्हा शंभरावर

0
308

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ११ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ७८९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील ६, चंदगड तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४ आणि इतर जिल्ह्यातील २, अशा १३ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर शहरातील शिवाजी पेठेतील १ तसेच डोंबिवली ठाणे इथला १, अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,७९३.

डिस्चार्ज – ४७,९७६.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १०२.

मृत्यू – १७१५.