कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६२ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आज (गुरुवार) दिवसभरात २३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ६१६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २७, भूदरगड तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ११, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील १६ अशा ६२ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील्या कणकवली तालुक्यातील एक वृद्ध महिला आणि कागल तालुक्यातील व्हनाळी येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,०६३.

डिस्चार्ज – ४८,९३५.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३७४.

मृत्यू – १७५४.