कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात ४६० हून अधिक रुग्ण

0
511

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८१ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर आज (शनिवार) दिवसभरात २४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर १,२७८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४०,गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील २, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील १०, राधानगरी तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १८ आणि इतर जिल्ह्यातील ६ अशा ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,२०७.

डिस्चार्ज – ४८,९८५.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ४६६.

मृत्यू – १७५६.