कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात २८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७१० जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ३, आजरा तालुक्यातील ३, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील २ आजरा आणि तालुक्यातील १ अशा एकूण ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर २८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,२००.

एकूण डिस्चार्ज : ४७,२७६.

उपचारासाठी दाखल रुग्ण : २३४.

एकूण मृत्यू : १६९०.