कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासात ६३ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाला आहे. तर आज (शुक्रवार) दिवसभरात २६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच २,२६८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह रुग्ण – कोल्हापूर शहरातील २५, आजरा तालुक्यातील ४, भूदरगड तालुक्यातील १, चंदगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ६, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ७ आणि इतर जिल्ह्यातील ७ अशा ६३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोल्हापूर शहरातील मंगळवारपेठ येथील एक वृद्ध महिला आणि राधानगरीमधील वृद्ध महिला अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,१२६.

डिस्चार्ज – ४८,९६१.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ४०९.

मृत्यू – १७५६.