कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शुक्रवार) दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच ६१८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील १०, चंदगड तालुक्यातील १, गगनबावडा तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोल्हापूर शहरातल्या विक्रमनगर येथील १ आणि निपाणी मधील १ अशा दोघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५०,१५५.

डिस्चार्ज – ४८,२८२.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १४९.

मृत्यू – १७३३.