कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस होतेयं. गेल्या चोवीस तासात ४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात २९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १,१८१ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २६, आजरा तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ४, पन्हाळा तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील ६ अशा ४६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील येल्लूर मधील ८६ वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,००१.

डिस्चार्ज – ४८,९१२.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३३७.

मृत्यू – १७५२.