कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ३ जण कोरोनमुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ५४७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील १, आजरा तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,०११.

डिस्चार्ज – ४८,१६७.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ११५.

एकूण मृत्यू – १७२९.