कोल्हापूर कोरोना अपडेट : गेल्या चोविस तासात आठ जणांना कोरोनाची लागण

0
85

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात ९ जण कोरोनामुक्त झाले असून गेल्या चोवीस तासात ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. तसेच १,१२१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील ४,कागल तालुक्यातील १,करवीर तालुक्यातील २,पन्हाळा तालुक्यातील १ अशा आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर भूदरगड तालुक्यातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,८५७.

डिस्चार्ज – ४८,०७६.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ६३.

मृत्यू – १,७१८.