कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४७ जणांचा डिस्चार्ज, एकाचा मृत्यू…

0
117

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासांत ३४ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (शनिवार) दिवसभरात ४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून ७०७ जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  

कोल्हापूर शहरातील २०, गडहिंग्लज तालुक्यातील ४, हातकणंगले तालुक्यातील आणि करवीर तालुक्यातील प्रत्येकी ३, कागल तालुक्यातील १ तर इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण ३४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. शाहूवाडी तालुक्यातील आवळी येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील आजअखेरची कोरोना रुग्णस्थिती –

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ५०, ६३४, डिस्चार्ज – ४८, ५१६, उपचारासाठी दाखल रुग्ण – ३७२, मृत्यू – १७४६.