कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ३७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १७४९ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ९,  गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १ आणि इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा २२ एकूण जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर करवीर तालुक्यातील रजपूतवाडी येथील १, शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर १ आणि खिद्रापूर येथील १, बेळगावमधील चिकोडी तालुक्यातील १ आणि सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील १ अशा ५ एकूण जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३७ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९,०८२ झाली असून ४७,०२० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६८४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ३७८ जणांवर उपचार सुरू आहेत.