कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) दिवसभरात ४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर गेल्या चोवीस तासात ९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ५९८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहे. कोल्हापूर शहरातील ७, कागल तालुक्यातील २ अशा नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आजऱ्यातील कुंभार गल्ली येथील एकाचा मृत्यू झाला आहे.
एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,८७४.
डिस्चार्ज – ४८,१००.
उपचारासाठी दाखल रुग्ण – ५४.
मृत्यू – १७२०.