कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच

0
1099

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवार) दिवसभरात ६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच  ४८० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४७, आजरा तालुक्यातील ४, गडहिंग्लज तालुक्यातील ३,  हातकणंगले तालुक्यातील ५, करवीर तालुक्यातील १२, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील ११ अशा ९१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इचलकरंजीमधील एका वृद्धाचा आणि कोल्हापूरातील प्रतिभानगर येथील एका वृद्ध महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,८९७.

डिस्चार्ज – ४९,३५८.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ७७१.

मृत्यू – १७६८.