कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ९३० जणांना लागण

0
452

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या २४ तासात ९३० जणांना कोरोनाची लागण झाली असून ३५ जणांचा बळी गेला आहे. आज (सोमवार) दिवसभरात ९६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर  २,९९३ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये – कोल्हापूर शहरातील २२९, आजरा तालुक्यातील ७, भुदरगड तालुक्यातील ६०, चंदगड तालुक्यातील १५, गडहिंग्लज तालुक्यातील ४, गगनबावडा तालुक्यातील ९, हातकणंगले तालुक्यातील ८५, कागल तालुक्यातील २३, करवीर तालुक्यातील १४८, पन्हाळा तालुक्यातील ३६, राधानगरी तालुक्यातील १६, शाहूवाडी तालुक्यातील ५८, शिरोळ तालुक्यातील ७३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ९१ यामध्ये (इचलकरंजी शहर ७६, जयसिंगपूर १४, पेठवडगाव १) आणि इतर जिल्ह्यातील ७६ अशा ९३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ७०,८४४

डिस्चार्ज – ५८,८८९

उपचारासाठी दाखल रुग्ण – ९,५९२

मृत्यू – २,३६३