कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) दिवसभरात ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्याचोवीस तासात ९ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर ८६६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५, आजरा तालुक्यातील १, भुदरगड तालुक्यातील २ आणि करवीर तालुक्यातील १ अशा नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोल्हापूरातील वाशी नाका येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,९५९.

डिस्चार्ज – ४८,१४७.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ८६.

मृत्यू – १७२६.