कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ८२ जणांना कोरोनाची लागण

0
350

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ७७ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. १,०९३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४४, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १०, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील १४ अशा ८२ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

तर कोल्हापूरातील शिवाजी पेठ येथील ७१ वर्षीय पुरुष, करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथील ५० वर्षीय महिला, कागल तालुक्यातील माद्याळ येथील ६२ वर्षीय पुरुष आणि हातकणंगले तालुक्यातील हेर्ले येथील ६८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,९७९.

डिस्चार्ज – ४९,४३५.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ७७२.

मृत्यू – १,७७२