कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (रविवार) दिवसभरात ३२ जण कोरोनामुक्त झाले असून १,१८१ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४२, भूदरगड तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ४, हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ५, पन्हाळा तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १२ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा ८० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,२८७.

डिस्चार्ज – ४९,०१७.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ५१४.

 मृत्यू – १७५६.