कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत चांगलीच घट होत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मागील चोवीस तासात ४७१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात १२ जणांचा मृत्यू झाला असून ७०१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – ६९, आजरा – ३, भुदरगड – १, चंदगड – २, गडहिंग्लज – १३, गगनबावडा – ०, हातकणंगले – १०७, कागल – २८,  करवीर – ६६, पन्हाळा – १६, राधानगरी – १, शाहूवाडी – १७, शिरोळ – ७६, नगरपरिषद क्षेत्र – ५६, इतर जिल्हा व राज्यातील – १६ अशा ४७१ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – २, ००, ३५७ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९०, ७२३

मृतांची संख्या – ५, ६०३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ४, ०३१