कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ६५ जणांना लागण

0
51

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ६५ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ४२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच १,०८९ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटीव्ह रुग्ण – कोल्हापूर शहरातील २७, आजरा तालुक्यातील ४, भूदरगड तालुक्यातील १,चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४, करवीर तालुक्यातील ७, राधानगरी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १ इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १० आणि इतर जिल्ह्यातील ७ अशा ६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इचलकरंजीमधील लक्ष्मीनगर इथल्या ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण -५१,४०३.

डिस्चार्ज – ४९,१०१.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ५४४.

मृत्यू – १७५८.