कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणावर ओसरू लागलीय. रुग्णसंख्येत घट होत असून मृत्यूदरातही चांगलीच घसरण होत आहे. मागील चोवीस तासात २९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ५ जणांचा मृत्यू झाला असून ६१३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र ८३, आजरा – ४, भुदरगड – ३, चंदगड – १, गडहिंग्लज १५, गगनबावडा – १, हातकणंगले – ३०, कागल – १५करवीर – ४९, पन्हाळा – १२, राधानगरी – ५, शाहूवाडी , शिरोळ – २७, नगरपरिषद क्षेत्र ३४, इतर जिल्हा व राज्यातील ०५ अशा २९३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती

एकूण रुग्ण , ०१, २९१ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या , ९२, ६१५

मृतांची संख्या , ६२३

उपचार सुरू असलेले रुग्ण –  ,०५३