कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १४२ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २ आणि इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ अशा ३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९, ३७२ झाली असून ४७, ५९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६९६ जणांचा मृत्यू झाला असून ८५ जणांवर उपचार सुरू आहेत.