कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४८ रुग्ण

0
200

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) ४८ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दिवसभरात १२ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,३५१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटीव्ह सापडलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३२, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ७ अशा ४८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,५५३.

डिस्चार्ज – ४८,४४१.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३६७.

मृत्यू – १७४५.