कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४४ जणांना कोरोनाची लागण

0
456

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ४४ जण कोरोना बाधित झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) दिवसभरात ५ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. १९४८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३३, आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा ४४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कोल्हापूर शहरातील राजारामपुरी ७ गल्ली येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण ५०,४३७.

डिस्चार्ज -४८,४००.

उपचारासाठी दाखल रुग्ण – २९३.

मृत्यू -१७४४.