कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ४३ जणांना कोरोनाची लागण

0
167

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ३४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ६५५ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २५, हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील ५, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ६ अशा ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकुण कोरोना बाधित रुग्ण – ५०,९५५.

डिस्चार्ज – ४८,८८३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३२१.

मृत्यू – १७५१.