कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (शुक्रवार) दिवसभरात ४७ जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १, ०८१ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३०, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २, राधानगरी तालुक्यातील २ आणि इतर जिल्ह्यातील ५ अशा ४३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील ५३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०, ८५९, डिस्चार्ज – ४८,८०३, उपचारासाठी दाखल रुग्ण – ३०६,
मृत्यू – १७५०.