कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ४० जणांना डिस्चार्ज

0
25

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २८ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. आज (मंगळवार) दिवसभरात ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३३७ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २०,  भूदरगड तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा २८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,७१७.

डिस्चार्ज – ४८,६४३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३२६.

मृत्यू – १७४८.