कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४० जणांना लागण

0
243

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात चोवीस तासात आणखी ४० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच आज (सोमवार) दिवसभरात १३ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. ३८५ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २७, भूदरगड तालुक्यातील १,चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, पन्हाळा तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे  कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,४७७.

डिस्चार्ज – ४८,४१३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३१९.

मृत्यू – १७४५.