कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (बुधवार) दिवसभरात १८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात आणखी ३३ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९७५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

तसेच कोल्हापूर शहरातील २४, करवीर तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ४ अशा ३३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ येथील १, हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील १ आणि चिकोडी तालुक्यातील १ अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,२८६.

डिस्चार्ज – ४८,३५८.

उपचारासाठी दाखल रुग्ण -१८७.

मृत्यू – १७४१.