कोल्हापूर कोरोना अपडेट : दिवसभरात ३३ जणांना लागण तर एकाचा मृत्यू

0
66

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ६१६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ५ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार चोवीस तासात कोल्हापूर शहरातील १८, चंदगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील ३, राधानगरी तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा ३३ एकूण जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४८, ६१३ झाली असून ४६,२६५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजवर १६६० जणांचा मृत्यू झाला असून ६८८ जणांवर उपचार सुरू आहेत.