कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच १,१४७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील २०, भुदरगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील २ आणि करवीर तालुक्यातील १ अशा २४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,८३४.

डिस्चार्ज – ४८,०२०.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ९९.

मृत्यू – १,७१५.