कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासांत २४ जणांना लागण…

0
32

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात २४ जणांना कोरोनाही लागण झाली आहे. आज (बुधवार) दिवसभरात ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७२३ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरातील १२,  हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा २४ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

कोरोनाबाधित रुग्ण – ५०,७४१, डिस्चार्ज – ४८,६८८, उपचारासाठी दाखल रुग्ण – ३०५, मृत्यू – १७४८.