कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २१ जणांना डिस्जार्ज मिळाला आहे. तर गेल्या चोवीस तासात ९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. १३३४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील ५, चंदगड तालुक्यातील ३ आणि पन्हाळा तालुक्यातील १ अशा नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आजरा तालुक्यातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,८४९.

डिस्चार्ज – ४८,०६७.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ६५.

मृत्यू – १७१७.