कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण

0
124

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शुक्रवार) दिवसभरात ८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर १,३०४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहरातील ९, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोल्हापूरातील लक्षतीर्थ वसाहतमधील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,९०९.

डिस्चार्ज – ४८,११३.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ७४.

मृत्यू – १,७२२.