कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात २० जणांना कोरोनाची लागण

0
212

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) आणखी २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दिवसभरात १९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच ७५२ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोल्हापूर शहरातील १३, शाहूवाडी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,२०६.

डिस्चार्ज – ४८,३०९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १६०.

मृत्यू – १७३७.