कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १९ जणांना कोरोनाची लागण

0
157

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात १९ जणांना कोरोनाची लागण झाली असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात चार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच १९७ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या मृत्यू झालेल्यांमध्ये इचलकरंजीतील १, कोल्हापूरातील साळुंखेनगर १ आणि नागाळा पार्क येथील एकाचा समावेश आहे.

तर पॉझिटीव्ह रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ८, गडहिंग्लज तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,१७४.

डिस्चार्ज – ४८,२८६.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १५२.

मृत्यू – १७३६.