कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात कोरोनाचे १९ रुग्ण

0
106

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे १९ रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात १४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ९७७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये, कोल्हापूर शहरातील १७, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा १९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,६००.

डिस्चार्ज – ४८,४६९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३८६.

मृत्यू – १७४५.