कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ३८ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (सोमवार) दिवसभरात १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १,११३ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १७, आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ३, हातकणंगले तालुक्यातील ३, करवीर तालुक्यातील २, पन्हाळा तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५ आणि इतर जिल्ह्यातील ६ अशा ३८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,९१२.

डिस्चार्ज – ४८,८४९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ३१२.

मृत्यू – १७५१.