कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (शुक्रवार) दिवसभरात ५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.  तर १,००३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  कोल्हापूर शहरातील १२, चंदगड तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा सोळा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,९८९.

 डिस्चार्ज – ४८,१५८.

 उपचारासाठी दाखल रुग्ण – १०४.

 मृत्यू – १७२७.