कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (रविवार) १५ जणांचे कोरोनाते अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर दिवसभरात २८ कोरोनामुक्त झाले आहेत. ८९७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ५, आजरा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा १५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,८७४.

डिस्चार्ज – ४८,८३१.

उपचारासाठी दाखल रुग्ण – २९३.

मृत्यू – १७५०.