कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात १५ जणांना कोरोनाची लागण 

0
169

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (रविवार) दिवसभरात ६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच १,७५० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ८, आजरा तालुक्यातील २, चंदगड तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा पंधरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,९३१.

डिस्चार्ज – ४८,१२६.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ८३.

मृत्यू – १७२२.