कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (गुरुवार) दिवसभरात ५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या चोवीस तासात १४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच १०५० जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ५, आजरा तालुक्यातील ४, गडहिंग्लज तालुक्यातील १,कागल तालुक्यातील १ आणि करवीर तालुक्यातील ३ अशा चौदा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोल्हापूर शहरातील कळंबा रोड येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोनाबाधित रुग्ण – ४९,९७३.

डिस्चार्ज – ४८,१५२.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ९४.

मृत्यू –  १७२७.