कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (सोमवार) दिवसभरात ३ जण  कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात १३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच ४८६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ९, करवीर तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा तेरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,९४४.

डिस्चार्ज – ४८,१२९.

उपचारासाठी दाखल रुग्ण -९३.

मृत्यू – १७२२.