कोल्हापूर कोरोना अपडेट : चोविस तासात १३ जणांना कोरोनाची लागण

0
199

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (मंगळवार) दिवसभरात १७ जणांनी केली कोरोनावर मात केली. तर गेल्या चोवीस तासात आणखी १३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ४८७ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये कोल्हापूर शहरातील ९, भूदरगड तालुक्यातील १, कागल तालुक्यातील २ आणि करवीर तालुक्यातील १ अशा तेरा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर गगनबावड्यातील निवडे येथील एकाचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,१२१.

डिस्चार्ज – ४८,२६०.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १३०.

मृत्यू – १७३१.