कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शुक्रवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १० जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दिवसभरात ४० जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १०२८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६.३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार मागील चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ५,  आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा एकूण १० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे, तर ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९, ००२ झाली असून ४६, ८७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर १६७६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण ४५० जणांवर उपचार सुरू आहेत.