कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रशासकीय कामकाज अभ्यासपूर्ण व अधिक लोकाभिमुख करा, अशा सूचना कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांनी केल्या. कोल्हापूर विभागाच्या माहिती उपसंचालक पदाचा कार्यभार आज (गुरूवार) स्वीकारल्यानंतर ते आयोजित बैठकीत बोलत होते.

यावेळी माहिती अधिकारी वृषाली पाटील, सहायक संचालक फारुख बागवान, क्षेत्रिय प्रचार अधिकारी हंसराज राऊत, माहिती सहायक एकनाथ पोवार, अमोल पाटील, सतीश शेंडगे, रोहित माने, सचिन वाघ, सतीश कोरे, अनिल यमकर, साक्षी मोरे, दामू दाते, प्रकाश पाटील, रावसाहेब पाटील, प्रकाश चव्हाण, स्वप्नाली कुंभार आदी उपस्थित होते.

डॉ. संभाजी खराट यांनी यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, कोकण भवन, रत्नागिरी, ठाणे, मंत्रालय याठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी तसेच वरिष्ठ सहायक संचालक पदाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. माहिती व जनसंपर्क विभागात समाज माध्यमांचा वापर अधिक प्रभावीपणे करण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. तसेच शासनाचे मुखपत्र लोकराज्य मासिकाच्या संपादनाचे कामही त्यांनी यशस्वीरित्या केले आहे. डॉ. खराट यांनी पत्रकारितेत पीएच. डी. केली असून त्यांची २५ पुस्तके प्रसिध्द झाली आहेत.